Species of Turtle : पुण्यातून आसामला विमानातून पाठवली दुर्मीळ कासवं |Pune| Assam| Sakal Media
कात्रज (Katraj)येथील हर्पेटोलॉजीकल सोसायटी आणि बावधानच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे असलेल्या ६३ दुर्मिळ प्रजातीची कासवे (species of turtle )पुणे वन विभागामार्फत आसाममधील (Assam) गुवहाटी या ठिकाणी त्यांच्या मूल अधिवासात सोडण्यात येत आहेत. या सर्व कासवांची संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या सर्व कासवांना हवाई मार्गाने त्यांच्या मूल अधिवासात पाठविण्याचा अभिनव उपक्रम राज्यात पहिल्यांदाच पुणे वन विभागाच्या वतीने करण्यात आला. अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनंसरक्षक विवेक खांडेकर, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल आणि उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.
#Turtle #Pune #PuneForestDepartment #Assam #Rarespeciesofturtle